'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच या मालिकेचे नवे भागही प्रसारित केले जात आहेत. सेटवर पुन्हा चित्रीकरणासाठी परतल्याने कलाकार मात्र आनंदी आहेत.
या मालिकेत गुरुनाथची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अभिजीत खांडकेकरने नुकतेच त्याचे सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिजीत लिहीतो की, "मी इथे आहे.. अद्याप मी नाही."
तर दुसऱ्या फोटोमधील कॅप्शनमध्ये अभिजीत लिहीतो की, "घाईत सामान्यात परतताना, ही वेळ विचार करण्यात वापरुया की सामान्यातला कोणता भाग घाई करून परतण्याजोगा आहे."
अभिजीतचे हे फॉर्मल लुक्समधील फोटो चाहत्यांना आवडत आहेत. या फोटोंवर लिहीलेले कॅप्शन मात्र विचार करायला लावणारे आहे.