तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातच बऱ्याच मालिकांच चित्रीकरण सध्या सुरु आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्याही चित्रीकरणाला सुरवात झाली आहे शिवाय नव्या भागांचे प्रसारणही सुरु आहे. यातच या मालिकेच्या नव्या भागांमध्ये प्रेक्षकांना नवं सरप्राईज पाहायला मिळालं. हे सरप्राईज म्हणजे पूर्वीची शनाया परत आली. अभिनेत्री रसिका सुनील ही या मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र त्यानंतर अभिनेत्री ईशा केसकर या भूमिकेत दिसली. मात्र लॉकडाउननंतर तीच शनाया परत आली आहे.
अभिनेत्री रसिकाही पुन्हा शनायाच्या भूमिकेत येऊन आनंदी आहे. नुकतच रसिकाने सोशल मिडीयावर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र फोटोसोबतच लिहीलेलं कॅप्शन मात्र लक्षवेधी असल्याचं पाहायला मिळतय.
रसिका या पोस्टमध्ये लिहीते की, "हा खास दिवस आहे." असं ती यात म्हणतेय. मात्र हा स्पेशल दिवस नक्की काय तर यासाठी रसिकाच्या पुढील पोस्ट पाहाव्या लागतील.