By  
on  

'शेवंता'चं हे रुप पाहुन तु्म्हाला वाटेल भिती, पोस्ट केला धडकी भरवणारा व्हिडीओ

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंताचे अनेक रुप आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र कायम चर्चेत असलेली ही शेवंता सोशल मिडीयावरही चर्चेत असते. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताचं कॅरेक्टर साकारतेय. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

अपूर्वा सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यातच तिने तिचं नवं युट्यूब चॅनेलही सुरु केलं आहे. नुकताच तिने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. शेवंता लुकमधील हा व्हिडीओ सगळ्यांचा धडकी भरवणारा आहे. नेहमी शेवंताचे सुंदर घायाळ करणारे लुक्स सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. मात्र यावेळी शेवंताचा हा भितीदायक व्हिडीओ पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहून शेवंताचे चाहतेही चांगलेच घाबरले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shevanta

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

या व्हिडीओला प्रसिद्ध सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे गाणं लावलं आहे. शेवंताचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मात्र चर्चेत आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive