By  
on  

‌‌‌संगीतकार स्नेहा खानवलकर कनु बहल बरोबर अडकली विवाहबंधनात अमृता सुभाषने शेअर केले फोटो

गॅंग्ज ऑफ वासेपूर मधील ओ वुमनिया गाण्याने प्रकाशझोतात आलेली संगीतकार स्नेहा खानवलकर दिग्दर्शक कनु बहलबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. स्नेहाचा विवाहसोहळा इंदौरमध्ये पार पडला.

अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णीही स्नेहाच्या लग्नाला हजर होते. यावेळी अमृताने लग्नाचे फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. स्नेहा आणि कनुने मराठी रितीरिवाजाप्रमाणे लग्न केलं.

स्नेहा आणि कनुची भेट ओय लक्की! लक्की ओय! सिनेमाच्या सेटवर झाली होती. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत होऊन दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. येत्या काही दिवसात हे नवदांपत्य दिल्लीमध्ये एक रिसेप्शन होस्ट करतील. त्यानंतर फ्रान्सला रवाना होत आहेत.

https://www.facebook.com/photo.php?fbid=2473827669354916&set=ecnf.100001831227016&type=3&theater

Recommended

PeepingMoon Exclusive