लॉकडाउनच्या काळात कित्येक जण त्यांच्या प्रवासातील आठवणी मिस करत आहेत. अभिनेत्री अनुजा साठे देखील तिच्या खास ट्रीप मिस करतेय. सध्या सगळेच घरात आणि काही जण कामासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची ट्रीप सध्याच्या परिस्थिती शक्य नसल्याने जुन्या टॅव्हल जर्नी सोशल मिडीयावर शेयर केल्या जात आहे.
अनुजाने नुकतीच तिची हिमाचल प्रदेशमधील ट्रीप मिस करत आहेत. आणि म्हणूनच या ट्रीपचे काही फोटो तिने पोस्ट केले आहेत. पुन्हा या ठिकाणी जायची इच्छा अनुजाने या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, "मला परत जायचं आहे, दैवी उपस्थिती आणि आत्मिय शांती अनुभवायची आहे, पुन्हा त्या माउंटन्ससोबत, पाण्यासोबत कनेक्ट व्हायचयं, मला पुन्हा घेऊन जा"
लॉकडाउननंतर आणि परिस्थिती पुर्ववत झाल्यावर अनुजा पुन्हा या सुंदर ठिकाणी जाईल हे निसर्गसौंदर्य पुन्हा अनुभवेल. मात्र सध्या तिने या जुन्या आठवणींच्या फोटोंवरच समाधान मानलय.