पाहा Video : प्राजक्ता माळीच्या साडीतील सुंदर अदा, बिहाइंड द सीन फोटोशुट

By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रीकरणाची परिस्थिती पुर्ववत झाल्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं चित्रीकरण करतेय. मात्र लॉकडाउनच्या काळात प्राजक्ता तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसली. तर कधी थ्रोबॅक आठवणीही तिने शेयर केल्या. नुकताच तिने आणखी एक थ्रोबॅक म्हणजे जुनी आठवण शेयर केली आहे. ही आठवण जास्त जुनी नसून अगदी सहा महिन्यांपूर्वीची म्हणजेच प्रीकोरोना आठवण आहे.

प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. तिच्या फोटोशुट दरम्यानचा हा बिहाइंड द सिन व्हिडीओ आहे. साडी नेसून फोटोसाठी पोझ देताना यात प्राजक्ता दिसतेय. प्राजक्ताच्या साडीतील सुंदर अदा यात पाहायला मिळत आहेत. या फोटोशुटला सहा महिने पूर्ण झाल्याचं प्राजक्ता सांगते. ही कोरोनापूर्व आठवण शेयर करत प्राजक्ता लिहीते की, "मी नेहमी बिहाइंड द सीन व्हिडीओच्या प्रेमात राहिलीय, हा माझा कोरोनापूर्व फोटोशुटचं बिहाइंड द सीन व्हिडीओ आहे, याला सहा महिने पूर्ण झाली आहेत."

 

 सोशल मिडीयावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ पसंत केला जातोय.

Recommended

Loading...
Share