By  
on  

विक्रम कुणाच्या बोटात घालणार साखरपुड्याची अंगठी, छत्रीवाली मालिकेत होणार खुलासा

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेत विक्रमच्या साखरपुड्याचं धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. विक्रमचा साखरपुडा नक्की मधुराशी होणार की नीलमशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

आईच्या अंतिम इच्छेखातर विक्रम नीलमशी लग्न करायला तयार झालाय. पण मधुरावर त्याचं जीवापाड प्रेम आहे. विक्रम आणि मधुराच्या प्रेमकहाणीचा खरंच अंत होणार का? याचं उत्तर छत्रीवालीच्या पुढील भागांमध्ये मिळणार आहे.

विक्रमच्या साखरपुड्यासाठी खास पाहुण्यांनी हजेरी लावलीय. शिल्पा शिंदे, ऋषी सक्सेना आणि सायली संजीव विक्रमला शुभेच्छा देण्यासाठी साखरपुड्याला आवर्जून उपस्थित होते. शिल्पा शिंदेने ठसकेबाज लावणी सादर करत या सोहळ्याची रंगत वाढवली तर सायली संजीव आणि ऋषी सक्सेनाने रोमॅण्टिक गाण्यावर ठेका धरला.

Recommended

PeepingMoon Exclusive