By  
on  

या खास व्यक्तिने दिल्या अभिनेता शंतनू मोघेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मालिका, नाटक, चित्रपटांमधील लोकप्रीय चेहरा अभिनेता शंतनू मोघेचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच अभिनेत्री आणि शंतनूची पत्नि प्रिया मराठेनेही त्याला हटके पद्धतिने शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाने शंतनूसोबतचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या पोस्टमध्ये प्रिया लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा डार्लिंग. आपल्या सोशल डिस्टंसिंग नाही, तू जे काही इच्छितो ते तुला मिळेल या शुभेच्छा."

प्रिया आणि शंतनू बऱ्याच कालावधीपासून मित्र होते. 2012मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. दोघही नाटक, मालिका आणि सिनेमांमधून विविध भूमिकांमधून लोकप्रिय झाले आहेत. 

'संभाजी' मालिकेती छत्रपती शिवाजी महाराजांची शंतनूने साकारलेल्या भूमिकेच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive