By  
on  

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लॉकडाउनमध्ये करतेय ही गोष्ट, रेखाटलं हे सुंदर चित्र

लॉकाडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कित्येकांनी केला. मिळालेल्या वेळेत काहींनी आपले छंद जोपासले तर काही नव्या गोष्टी शिकले. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या काळात तिची चित्रकलेची आवड जोपासताना दिसत आहे. 

प्रार्थनाला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. हीच आवड ती या लॉकडाउनमध्ये घरात बसून जोपासताना दिसतेय. नुकतच प्रार्थनाने एक सुंदर पेटिंग तयार केलं आहे. प्रार्थनाने सोशल मिडीयावर या पेंटिंगचे फोटो शेयर केले आहेत. 

 

प्रार्थना या पोस्टमध्ये लिहीते की, "असं काहीतरी करण्याचा पहिलाच प्रयत्न.." या पोस्टमध्ये प्रार्थनाने हे चित्र तयार होतानाचे तिन टप्पे फोटोंमधून शेयर केले आहेत.

य़ाआधीही प्रार्थनाने काढलेली सुंदर पेंटिंग पाहायला मिळाली होती. प्रार्थनाच्या या पेंटिंगचं तिच्या चाहत्यांनीही कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Paint your own world.... . #painting #meditation #myart #myway #happyquarantine #happyme

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive