आत्तापर्यंत विविध खेळांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिलेत पण अस्सल मातीतला खेळ 'कबड्डी' तसा दुर्लक्षितच राहिला म्हणायचा. नेमकी हीच बाब हेरत जयंत लाडे निर्माता हयांचा लाडे ब्रोज् फिल्म्सप्रा. लि या निर्मितीसंस्थेचा 'सूर सपाटा' हा गावठी कबड्डीवर आधारित मराठी चित्रपट २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्राला कबड्डी... कबड्डी... म्हणायला भाग पाडेल यात काही शंका नाही. तत्पूर्वी मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची एकखास झलक आपण पाहू शकणार आहोत. ७० एम एमवरखेळल्या जाणाऱ्या या चित्रपटाची सध्या चर्चा सर्वत्र रंगलीअसून त्याचा वेगवान, उत्कंठा ताणणारा टिझर प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली 'सूर सपाटा'ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हापरिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा 'सूर सपाटा' प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो. लाडे ब्रोज् फिल्म्सचा 'सूर सपाटा' हा दुसरा चित्रपट असून या आधी त्यांनी 'पेईंग घोस्ट' या विनोदी चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली होती.
अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीयपुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यशकुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्येआपल्याला पहायला मिळतील. किशोर खिल्लारे, सुभाषगुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूरसपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफाआमने-सामने येणार असून तूर्तास त्यांची नावे गुलदस्त्यातआहेत. विशेष म्हणजे 'सूर सपाटा'ला माजी कबड्डीपटू अर्जुनपुरस्कार विजेते मा. श्री. शांताराम जाधव यांचे मोलाचेसहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रिय सहभाग यात रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेशकंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजयमिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला असून अभिनय जगताप चे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.
https://youtu.be/kCl8DuUUNSw