By  
on  

पाहा Video : पहिल्याच सिनेमात चिराग पाटील झळकला होता या लेजंड कलाकारासोबत, असं दिलं ट्रिब्यूट

अभिनेता चिराग पाटीलने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. त्याने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तो गाणं गाताना आणि किबोर्ड वाजवताना दिसतोय.

चिराग हा लेजंड अभिनेते देव आनंद यांचा चाहता आहे. शिवाय त्याच्या करियरच्या सुरुवातीला त्याने केलेल्या पहिल्याच सिनेमात देव आनंद असल्याचं तो या पोस्ट मध्ये सांगतो. या सिनेमात त्याची छोटी भूमिका होती. मात्र देव आनंद यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला या निमित्ताने मिळाली होती.

 

नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत चिराग ने 'हे अपना दिल तो आवारा' हे प्रसिध्द देव आनंद यांचं गाणं गायलं, शिवाय हे गाणं त्याने  किबोर्डवर वाजवलं देखील. या पोस्टमध्ये चिराग लिहीतो की, "देव साहेब यांच्या आठवणीत. जास्त लोकांना माहिती नाही की माझा पहिला सिनेमा देव आनंद यांच्यासोबत होता. माझा अगदी छोट रोल होता पण लेजंडसोबत काम करण्याचा अनुभव जबरदस्त होता."

 सोशल मिडीयावर चिरागचा हा व्हिडीओ पसंत केला जात आहे. देव आनंद यांच्यासाठीचं त्याचे हे अनोखं ट्रीब्युट लक्षवेधी ठरतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive