By  
on  

मराठी सिनेमात झळकण्याबद्दल श्रिया पिळगावकरने केला खुलासा, पाहा काय म्हणते ती

अभिनेते सचिन-सुप्रिया पिळगावकर यांची कन्या सध्या तिच्या साऊथ इंडस्ट्रीमधील डेब्युमध्ये व्यस्त आहे. श्रिया ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात राणा दग्गुबाती सोबत काम करणार आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील हा तिचा पहिलाच सिनेमा आहे.

अलीकडेच श्रिया मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये काम केलं होतं. श्रियाच्या या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. श्रिया स्वत:च्या हिमतीवर या क्षेत्रात स्थिरावत आहे. श्रियाने ‘एकुलती एक’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर मात्र ती कुठल्याच मराठी सिनेमात झळकली नाहीत. दरम्यान तिने शाहरुखसोबत ‘फ़ॅन’ या सिनेमातही भूमिका साकरली होती.

मराठी सिनेसृष्टीपासून बराच काळ दूर राहिलेली श्रिया मराठी सिनेमा कधी करणार असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर श्रियाने दिलं आहे. श्रियाने यावर्षी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बघुया यावर्षी श्रियाचा कोणता मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ते पाहू.

Recommended

PeepingMoon Exclusive