शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकने अवघ्या दोन दिवसातच रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. ठाकरे सिनेमात बाळासाहेबांची संघटना बांधणी आणि त्याचा जनमानसावरील प्रभाव याचं उत्तम चित्रण करण्यात आलं आहे.
हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी प्रमोशनमध्ये कोणतीही कसर बाकी न ठेवल्याचा परिणाम सिनेमा रिलीज झालेल्या दिवशीच दिसून आला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी सहा कोटींची कमाई केली. तर शनिवारी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी या सिनेमाच्या पथ्थ्यावर पडली आहे. त्यामुळे या सिनेमाचं शनिवारचं कलेक्शन जवळपास १० कोटींचं होतं. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने १६ कोटींचा गल्ला जमवला आहे. बाळासाहेब ठाकरेंचं जनमानसातील असलेलं स्थान पाहता हा सिनेमा कमाईचे आणखी उच्चांक गाठेल यात शंका नाही. या सिनेमाची निर्मिती संजय राऊत यांनी केली असून अभिजीत पानसे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी यात बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसला आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/1089432496205250560