By  
on  

सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकरसाठी गायलं गाणं, मित्राने केला व्हिडिओ शेअर

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या जोडीने साखरपुडा केला. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंत या कार्यक्रमाला हजर होते.

सिद्धार्थचा मित्र असलेला सुयश टिळक याने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवर या कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ मितालीसाठी गाणं म्हणत आहे. त्यावेळी मितालीदेखील इमोशनल झाली होती.

सुयशने हा मोमेंट मोबाईलमध्ये कॅप्चर करून त्यांना साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सोहळ्याला मृण्मयी देशपांडेने पतीसोबत हजेरी लावली होती. याशिवाय अमेय वाघ, सुयश टिळक यांनीही हजेरी लावली होती. साखरपुड्यामध्ये सिद्धार्थ आणि मितालीच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वहात होता. सिद्धार्थ अग्निहोत्र मालिकेपासून प्रकाशझोतात आला. मितालीने उर्फी या सिनेमात काम केलं आहे. मागील वर्षी सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाची रसिकांना उत्सुकता होती.

[video width="640" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/01/sid-sings-a-song.mp4"][/video]

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive