रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणींचं प्रेम साजरा करण्याचा दिवस. एकमेकांची रक्षा करण्यासाठी कायम एकमेकांची साथ देणाऱ्या भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि गंमत वेगळीच आहे. आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावरही भावा बहिणींच्या या जोड्या उत्साहात हा सण साजरा करत असल्याचं पाहायला मिळतय.
आयरन मॅन म्हणून ओळख असलेल्या मिलिंद सोमणनेही रक्षाबंधन साजरी केली आहे. त्याने या सणाचे खास फोटोही शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या बहिणींसोबतचे फोटो शेयर केले आहेत.
या पोस्टमध्ये मिलिंद सोमण लिहीतो की, "या महिला माझ्या अवतीभवती असल्यामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. कोण कुणाची रक्षा करतं ? माणसांना वाटतं की ते महिलांची सुरक्षा करतात पण मला असं नेहमी वाटतं की महत्त्वाच्या वेळी हे अगदी विरद्ध असतं."
या फोटोंमध्ये मिलिंदची पत्नी अंकिताही पाहायला मिळतेय.