By  
on  

पाहा Video : रिंकू राजगुरुचा हा अंदाज याआधी कधीच पाहिला नसेल

'सैराट' फेम रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. विशेषकरून लॉकडाउनच्या काळात ती सोशल मिडीयावर जास्त सक्रिय  दिसली.

इन्स्टाग्रामवर नुकतच आलेलं रिल हे फिचर सगळेच करून पाहत आहेत. रिंकूनेही रिलचा वापर करून एक व्हिडीओ पोस्ट केला. रिंकूचा हा स्लो मोशन व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा' सिनेमातील म्युझिकवर तिने हा व्हिडीओ केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sometimes it is better to be slow down in life and enjoy the moment that is happening #firsttimereelsvideo #

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, "कधीतरी आयुष्यात धिमी गतीही चांगली असते आणि जे घडतय त्याची मजा घ्या". रिंकूच्या प्रत्येक पोस्टमधून सध्या सकारात्मक दृष्टीकोन देणारे मेसेज आणि पोस्ट पाहायला मिळतात.

 लॉकडाउनमध्ये रिंकूने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. 'हंड्रेड' या वेब सिरीजमधून रिंकू झळकली. तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं. आगामी काळातही रिंकू आणखी एका हटके भूमिकेत झळकणार आहे. आत्तापर्यंत 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्येही रिंकूने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive