सिध्दार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे २१ दिवसांसाठी झाले एकमेकांसोबत क्वारंटाईन

By  
on  

जवळपास तीन ते चार महिने होऊन गेले आहेत आपण प्रत्येकानेच लॉकडाऊन आणि क्वारंटाईन हा काळ अनुभवला आहे. आता याचा वैताग येऊ लागलाय. आणि पुन्हा एकदा आपलं रुटीन कधी एकदा सुरु होतंय, असे वेध लागले आहेत. अशातच मात्र मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि गोड अभिनेत्री पर्ण पेठे या दोघांनी मात्र  हौसेने एकमेकांसोबत क्वारंटाईन होणं पसंत केलं आहे. काय, तुम्हालासुध्दा आश्चर्य वाटलं ना.

सिध्दार्थ आणि पर्ण यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन आम्ही एकत्र क्वारंटाईन झालो आहोत आणि तेसुध्दा अनपेक्षितपणे २१ दिवसांसाठी अशा आशयाच्या पोस्ट केल्या आहेत.  त्यामुळे साहजिकच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Quarantined together unexpectedly. #21days

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

 

बहुधा दोघंही एखाद्या नव्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र २१ क्वारंटाईन झाल्याचं दिसतंय. याबाबतची अधिक माहिती अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे....पण पर्ण आणि सिध्दार्थ आम्ही तुमच्या पुढील पोस्टची वाट पाहतोय. 

Recommended

Loading...
Share