By  
on  

पाहा Photos : 'येरे येरे पैसा' सिनेमाच्या चित्रीकरणाला कलाकारांनी अशी केली होती मस्ती

प्रसिद्ध ुनृत्यदिग्दर्शक उमेश जाधव सध्या त्यांच्या विविध जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. यासाठी ते सोशल मिडीयावर दररोज विविध पोस्ट करतात. नुकतेच त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो आहेत 'येरे येरे पैसा' या सिनेमाच्या चित्रीकरणाचे. 

उमेश जाधव यांनी या फोटोंमध्ये या सिनेमातील गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानच्या आठवणी शेयर केल्या आहेत. या फोटोंमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत, उमेश कामत, मृणाल कुलकर्णी आणि इतर टीम पाहायला मिळतेय. सिनेमाच्या चित्रीकरण दरम्यानचे हे ऑफस्क्रिन क्षण त्यांनी या पोस्टमधून शेयर केले आहेत.

ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "येरे येरे पैसा, किती मजेशीर शूट होतं हे, सगळी गाणी चित्रीत करण्याचा अनुभव हास्यकलौळ होता. खरचं कायम लक्षात राहणारं." असं लिहून त्यांनी या खास आठवणी पोस्ट केल्या आहेत. 'येरे येरे पैसा' हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.

 

Recommended

PeepingMoon Exclusive