By  
on  

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण, केंकरे रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.   त्यांनी सुरुवातीला स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले होते. मात्र आता त्यांना वांद्रा येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंकरे यांना सौम्य ताप होता. तेव्हा पासून ते घरीच होते.

आज त्यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी एका प्रसिद्ध वेब पोर्टलला अभिनेता विनय येेडेकर यांनी माहिती दिली आहे की, "त्यांना गेले आठ ते नऊ दिवस ताप येत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive