By  
on  

मराठीतील पहिला झॉम-कॉम सिनेमा 'झोंबिवली' चं मोशन पोस्टर प्रदर्शित

पुढील वर्षी मराठी प्रेक्षकांसाठी एक आगळा वेगळा अनुभव घेऊन येत आहे 'झोंबिवली' हा सिनेमा. हा मराठीतील पहिला हॉरर कॉमेडी सिनेमा असेल. ज्याला झॉम-कॉम असही म्हणता येईल कारण यात झोंबि हा प्रकारही पाहायला मिळेल. पुढील वर्षी 2021मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत..  या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

 

अभिनेता अमेय वाघ आणि ललित प्रभाकर या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. अमेय आणि ललितने नुकतच सोशल मिडीयावर या सिनेमाचा मोशल पोस्टर प्रदर्शित केला आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळाही मुंबईत पार पडला होता. आत्तापर्यंत हॉलिवुड आणि बॉलिवुडमध्ये झोंबिवर आधारित सिनेमे पाहिले होते. मात्र हा प्रयोग पहिल्यांदाच मराठीत होत असल्याचं या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive