By  
on  

अभिनेता स्वप्निल जोशी घेऊन येतोय नवं मराठी गाणं, स्वप्निलच्या पिल्लू टीव्हीवर गाणं होणार प्रदर्शित

मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार हे सोशल मिडीयावर सक्रीय आहेत. यात युट्यूब प्लॅटफॉर्मवरही काही कलाकारांचे युट्यूब चॅनेल्स आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीचं देखील पिल्लू टीव्ही नावाचं युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर स्वप्निल हा सुरुवातील त्याच्या मुलांचे विविध व्हिडीओ पोस्ट करत असे. मात्र लॉकडाउनच्या काळात स्वप्निलने या चॅनेलवर विविध गोष्टी पोस्ट केल्या. यात त्याच्या विविध प्रसिद्ध मालिकांच्या आठवणींचा देखील समावेश आहे.

यातच स्वप्निलच्या पिल्लू टीव्ही चॅनेलवर आता एक नवंकोरं मराठी गाणंही प्रदर्शित होणार आहे. या गाण्याविषयीची पोस्ट स्वप्निल जोशीने शेयर केली होती. 'वामांगी' असं या गाण्याचं नाव आहे.या पोस्टमध्ये स्वप्निल लिहीतो की, "दर्शनाची ओढ, भेटीची आस अंगी लवकरच घेऊन येत आहोत विठ्ठल वामांगी!"

 

यात त्याने गाण्याचा टीझरही प्रदर्शित केला. या गाण्याविषयी सांगण्यासाठी स्वप्निलने नुकताच एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओत स्वप्निल या गाण्याची माहिती देत आहे. पिल्लू टीव्हीवरील हे पहिलं वहिलं ओरिजीनल गाणं असेल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive