आजकाल गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहून सामान्य व्यक्ती अस्वस्थ होते. पण पुरेशी काळजी घेतली या घटना टाळता येऊ शकतात. नेमका हाच संदेश घेऊन सुनील बर्वे येणार आहे ‘महाराष्ट्र जागते रहो’ या कार्यक्रमात. कलर्स मराठीवर ३१ जानेवारीपासून प्रसारित होत असलेल्या या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सुनील करणार आहे.
आपण अनेकदा अजाणेतेपणे आपली खासगी माहिती अनोळखी व्यक्तीसमोर जाहीर करत असतो. पण तिथच चूक होते आणि आपण गुन्ह्याला बळी पडतो. अशा काही घटनांचा मागोवा “महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही या कार्यक्रमातून घेतला गेला आहे. गुन्हेगारी हा विषय पार्श्वभूमी असलेल्या अनेक मालिका हिंदी वाहिन्यांवर आहेत, परंतु मराठी वाहिन्यांवर त्याची कमतरता आहे. नेमकं हेच हेरुन कलर्स मराठीने हा कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आणला आहे. या कार्यक्रमाविषयी सुनील बर्वे म्हणतात, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळ करण्याची इच्छा होती. महाराष्ट्र जागते रहो - अजूनही वेळ गेली नाही सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे.
एखादा गुन्हा घडण्यापूर्वी सतर्कता बाळगायची असते हे अनेकदा विसरलं जातं. त्यामुळेच दृष्ट वृत्तींना संधी मिळत जाते. पण महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही या कार्यक्रमामुळे ही सतर्कता वाढीस लागेल अशी आशा करायला हरकत नाही.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1082890956150583297