पाहा Video : एका झटक्यात रुमाल गायब करून विराजसने अशी करुन दाखवली जादू

By  
on  

'माझा होशील ना' या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील त्याची आदित्यची भूमिका आहे. या मालिकेच्या सेटवरील विविध व्हिडीओ आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. विराजस आणि गौतमी देशपांडे यांची सेटवरील मस्तीदेखील पाहायला मिळाली आहे. मात्र नुकताच विराजसचा एक असा व्हिडीओ पाहायला मिळाला ज्याविषयी काहींना माहिती नसेल.

नुकताच विराज कुलकर्णी हा जादू करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विराजसने स्वत: सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत विराजस एका रुमालसोबत जादुई खेळ करताना दिसतोय. एका झटक्यात रुमाल गायब करून दुसरा रुमाल तो तोंडातून काढून दाखवतो. विराजसच्या या व्हिडीओने नेटकरी चकीत झाले असणार यात शंका नाही.

 

विराजसला जादुई खेळ करण्याची आवड आहे आणि तो एक उत्तम जादूगार असल्याचं कित्येकदा समोर आलय. याविषयी फार कमी जणांना माहिती असली तरी या व्हिडीओच्या माध्यमातून आता विराजसचं जादूविषय़ीचं प्रेम समोर आलं आहे. खूप दिवसांनी जादू केली असल्याचा आनंद विराजस या पोस्टमध्ये व्यक्त करतो.

Recommended

Loading...
Share