मानसी नाईककडे आहेत इतक्या मांजरी, कॅट डेच्या निमित्ताने पोस्ट केला हा व्हिडीओ

By  
on  

आज आंतरराष्ट्रीय कॅट डे (मांजर दिन) च्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयावर त्यांच्या मांजरींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकारांकडे मांजरी आहेत. त्यांनीही सोशल मिडीयावर आज खास पोस्ट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री मानसी नाईकलाही मांजरींची आवड आहे. तिच्या घरी तब्बल 15 मांजरी आहेत. या मांजरींचं पालन पोषण आणि त्यांची काळजी घेण्याचं काम मानसी करते. या पंधरा मांजरींना एकत्रच जेवण दिलं जातं. नुकताच मानसीने तिच्या मांजरींसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि कॅट लव्हर्सन इंटरनॅशनल कॅट डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओत मानसी तिच्या मांजरांना जेवणासाठी एकत्र गोळा करताना दिसत आहे. 'चला जेवायला' अशी हाक दिली की मानसीच्या सगळ्या मांजरी जेवणासाठी एकत्र गोळा होतात.

 

या पोस्टमध्ये ती लिहीते की, "चला जेवायला, 15 मांजरांची कॅट मॉम,  इंटरनॅशनल कॅट डेच्या शुभेच्छा, म्याऊ म्याऊ बोलायला विसरू नका."

Recommended

Loading...
Share