By  
on  

पाहा Video : प्रार्थना बेहेरे करतेय बाप्पाच्या आगमनाची अशी तयारी, मातीपासून साकारला बाप्पा

लवकरच लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत  विविध गोष्टींची काळजी घेऊन यावर्षी बाप्पाचं आगमन करण्यात येईल. काही ठिकाणी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही बाप्पाचं आगमनाच्या तयारीला सुरुवात केलेली पाहायला मिळतेय. प्रार्थनाने चक्क हाताने गणपतीची मुर्ती साकारली आहे. नुकतेच तिने याचे काही फोटो पोस्ट केले होते. मात्र आता नुकताच एक व्हीडीओ पोस्ट करून ही मुर्ती कशी साकारली ते या व्हीडीओत पाहायला मिळतय. प्रार्थनाने तिच्या हाताने बाप्पाची सुंदर मुर्ती साकारल्याचं दिसतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ॐ गं गणपतये नमः

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

अभिनेता भूषण प्रधानच्या आईकडून प्रार्थनाला प्रेरणा मिळाल्याचही एका पोस्टमध्ये तिने लिहीलं होतं. भूषणची आई दरवर्षी घरातच बाप्पाची मुर्ती तयार करतने आणि त्याची पूजा करून घरातच त्याचं विसर्जन केलं जातं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive