By  
on  

या मराठी सिनेमाला तीन वर्षे पूर्ण, सिनेमाला मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

कच्चा लिंबू या मराठी सिनेमाला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सिनेमाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. याच सिनेमातून अभिनेता प्रसाद ओक यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. आणि त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. 

प्रसाद ओक यांनी सोशल मिडीयाव पोस्ट करून या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "कच्चा लिंबू, आज 3 वर्ष पूर्ण झाली...!!! माझ्या पहिल्याच दिग्दर्शनाला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला...!!! माझ्या संपूर्ण टीम चे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!!" 

या सिनेमाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सिनेमाशी जोडलेल्या इतरही कलाकारांनी सोशल मिडीयावर या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#कच्चालिंबू आज 3 वर्ष पूर्ण झाली...!!! माझ्या पहिल्याच दिग्दर्शनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला...!!! माझ्या संपूर्ण टीम चे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!! #जयवंतदळवी @chinmay_d_mandlekar #माझीपूर्णदिग्दर्शकीयटीम @ravijadhavofficial @sachinskhedekar @sonalikul @themanmeetpem @ananthmahadevanofficial @amalendu.choudhury @rahulranade @ameygosavi @santosh.phutane.7 @aakashpendharkar @abhijit_guru @manjiri_oak @tejendraneswankar @gayatrikhichadi @satavvinod and @mandarr_devsthali ️️️️️

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

या सिनेमाची कथा ही मोहन काटदरे आणि शैला काटदरे यांना एक दिव्यांग मुलगा बच्चू यांच्याभोवती फिरणारी आहे. 'कच्चा लिंबू' या सिनेमातून रवी जाधव यांनी अभिनयात पदार्पण केलं होतं. रवी जाधव यांच्यासह या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत होते. 2018 मध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  चिन्मय मांडलेकर लिखित या सिनेमाची निर्मिती मंदार देवस्थळी यांनी केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive