जन्माष्टमीला 'बाहुबली'च्या या गाण्यावर थिरकली अभिनेत्री सई लोकूर

By  
on  

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर आज विविध पोस्ट पाहायला मिळत आहेत. कुणी कृष्णाचे फोटो, गाणे पोस्ट करून एकमेकांना शुभेच्छा देत आहेत तर कुणी हटके पोस्ट करून. मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरनेही जन्माष्टमीच्या निमित्ताने एक हटके पोस्ट केली आहे.

सई लोकूरला नृत्याची प्रचंड आवड आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी सईने तिचा डान्स व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'बाहुबली' या सिनेमातील 'कान्हा सो जा जरा' या गाण्यावर सई थिरकली आहे. सईचा हा सुंदर डान्स चाहत्यांनाही प्रचंड आवडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Choreography- @that_curly_hair_gal

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वामध्ये सई स्पर्धक म्हणून दिसली होती. या कार्यक्रमात दिले जाणारे टास्क उत्तम खेळल्यामुळे सई चर्चेत राहिली. शिवाय सई ही काही मराठी सिनेमांमध्येही झळकली आहे. कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करू' या हिंदी सिनेमातही सई झळकली आहे. 

Recommended

Loading...
Share