गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सगळीकडे उत्साहात सुरु आहे. काही जण घरातच बाप्पाची मूर्ती साकारून त्याची मनोभावे पुजा करून घरातच विसर्जन करतात. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शिक रवी जाधवदेखील गेल्या काही वर्षांपासून आपल्या हाताने घरातच गणपतीची मूर्ती तयार करतात. आणि याच बाप्पाचं गणेश चतुर्थी दरम्यान पूजन केलं जातं. ही मूर्ती इकोफ्रेंडली असल्याने घरातच हा मूर्तीचं विसर्जन केलं जातं. पर्यावरण रक्षणाऱ्या दृष्टीने ही इकोफ्रेंडली मूर्ती तयार केली जाते.
नुकतच रवी जाधव यांनी ही मूर्ती तयार झाल्यानंतरचा मूर्तीचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "मातीपासून मूर्तीपर्यंत". मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीचा प्रवास त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.
इकोफ्रेंडली बाप्पा आणण्याचं रवी जाधव यांचं यंदाचं हे 18 वं वर्ष आहे.