सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थिती सण उत्सव, वाढदिवस या गोष्टी साजरा करणं जरा कठीणच झालय. मात्र यातूनही मार्ग काढून आपल्या प्रियजनांसोबत खास क्षण साजरे केले जात आहेत.
अभिनेत्री प्रिया मराठेनेही तिच्या पतीसोबतचा खास दिवस साजरा करण्याचं ठरवलं. पती अभिनेता शंतनु मोघेच्या वाढदिवसानिमित्ताने प्रियाने हा दिवसा खास करण्याचं ठरवलं. आणि एका निसर्गरम्य ठिकाणी दोघांनी हा दिवस साजरा केला.
यावेळी या निसर्गरम्य ठिकाणी दोघांनी पावसाचा आनंद लुटत शंतनुच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.