By  
on  

या कारणासाठी शनाया दिसली या पेहरावात, या अभिनेत्रीला दिलं ट्रिब्यूट

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलही प्रचंड लोकप्रीय झाली. मोठ्या ब्रेकनंतर रसिका शनाया म्हणून परतली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर रसिका पुन्हा शनायाच्या भूमिकेत दिसतेय.

नुकतच एका खास कार्यक्रमासाठी रसिकाने परफॉर्म केलं आहे. रसिकाने नुकताच सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रसिकाचा वेगळा लुक पाहायला मिळतोय. अभिनेत्री स्मिता पाटील यांना ट्रिब्यूट देणाऱ्या एका कार्यक्रमात रसिकाने परफॉर्मन्स दिला आहे. यासाठीच रसिकाचा हा लुक पाहायला मिळाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Loved performing this one for @sonymarathi Tribute to Smita Patil ji

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

स्मिता पाटील यांच्या सिनेमांमधील वेशभुषेत रसिका या फोटोत दिसत आहे. रसिकाचा हा परफॉर्मन्स पाहणं औत्सुक्याचं असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive