"गोविंदा आला रे" म्हणत प्रसाद ओकने पोस्ट केला हा फोटो

By  
on  

दरवर्षीप्रमाणे गोपाळकालाचा उत्साह या वर्षी पाहायला मिळत नाहीय. कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे अनेक सण उत्सव घरात बसूनच साजरे करावे लागत आहेत. असं असलं तरी सोशल मिडीयावर या उत्सवाच्या निमित्ताने विविध पोस्ट केल्या जात असतात. आज गोपाळकालाच्या निमित्तानेही मनोरंजन विश्वातील कलाकारांनी विविध पोस्ट केल्या आहे.

या दिवशी गोविंदा आला रे म्हणत जयघोष करत हंडी फोडली जाते. मात्र यावर्षी ते शक्य नसल्याने सोशल मिडीयावर पोस्ट करून कलाकार आनंद व्यक्त करत आहेत. अभिनेता प्रसाद ओकनेही सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोत प्रसाद ओक कृष्णाच्या रुपात पाहायला मिळतोय. त्याच्या चाहत्यांनाही हा फोटो प्रचंड आवडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गोविंदा आलाsssss रे आलाsssss

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीया पोस्ट केली आहे. कुणी हंडी फोडतानाचा जुना व्हिडीओ तर कुणी कृष्ण रूपातले फोटो पोस्ट केले आहेत.

Recommended

Loading...
Share