By  
on  

स्वरालीच्या स्वरांनी जिंकलं सगळ्यांचं मन, सुर नवा, ध्यास नवा छोटे सुरवीरची राजगायिका

लहान मोठे प्रत्येकालाच ज्यांच्या स्वरांनी मोहीनी घातली त्या गायकांपैकी कोणा एकाची निवड करणं खरंतर अवघड होतं. पण परीक्षकांनी हे अवघड आव्हान पेललं आणि महाराष्ट्राला मिळाली नवी राजगायिका. सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या सहा गायकांपैकी माहुरच्या स्वराली जाधवला राजगायिका होण्याचा मान मिळाला. गेले सहा महिने चाललेल्या या स्वरसोहळ्याची सांगता नुकतीच झाली. स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्याहस्ते स्वरालीला कट्यारीचा मान मिळाला.

२१ सुरवीरांपासून सुरू झालेला हा प्रवास सहा अंतिम गायकांपर्यंत येऊन पोहोचला. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये स्वराली जाधव, मीरा निलाखे, सई जोशी, उत्कर्ष वानखेडे, चैतन्य देवढे अणि अंशिका चोणकर यांचा समावेश होता.

स्वरालीला बक्षिसम्हणून एक लाखाचा धनादेश, मानाची सुवर्ण कट्यार आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल नासा USA टूर – ज्यामध्ये युनिव्हर्सल स्टुडीओज आणि डिझनीलैंड बरोबर मनोरंजन आणि ऍडव्हेंचर थीम पार्क बघण्याची सुर्वणसंधी मिळणार आहे. तर पाच छोट्या सुरवीरांसोबत मॉनिटरला देखील कलर्स मराठी तर्फे एक लाखाचा धनादेश आणि केसरी टूर्स तर्फे स्टुडन्ट स्पेशल हिमाचल प्रदेशचा दौरा ही विशेष भेट मिळाली.

अंतिम सोहळ्यामध्ये महेश काळे यांची छोट्या सुर शिलेदारांसोबत रंगलेली संगीत मैफल विशेष ठरली. या सोहळ्यात मागे राहील तो मॉनिटर कसला ! त्याने प्रसेनजीत कोसंबी यांच्यासोबत गायलेल्या पोवाड्याला रसिकांनी उत्तम दाद दिली. याशिवाय कॅप्ट्न्सनीही आशाताईंची गाणी म्हटली. या सुरेल समारोपातच रसिकांना सुर नवा, ध्यास नवाच्या पुढच्या पर्वाची ओढ लागली असेल यात शंका नाही.

https://www.instagram.com/p/BtbVzdfDiGc/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive