By  
on  

कौटुंबिक भावनांची गुंतागुंत असलेल्या‘काही क्षण प्रेमाचे’चा पाहा ट्रेलर

आपल्या दमदार अभिनयासोबतच दमदार चित्रपट देऊन २०१८ वर्ष गाजवलेला अभिनेता सुबोध भावे २०१९ मध्येही प्रेमाची उधळण करायला सज्ज झाला आहे, ‘काही क्षण प्रेमाचे’ ह्या त्याच्या आगामी चित्रपटातून. ज्योतीप्रकाश फिल्म्स आणि हरिश्चंद्र गुप्ता निर्मित आणि डॉ. राज माने लिखित आणि दिग्दर्शित ‘काही क्षण प्रेमाचे’ ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ह्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी घरातील कर्ता पुरुष अतोनात कष्ट करत असतो. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या आनंदासाठी त्याचे नेहमीच प्रयत्न चालू असतात. ह्या जबाबदाऱ्या आणि गरजा भागवण्याच्या धावपळीतून त्याला आपल्या कुटुंबासोबत दोन प्रेमाचे शब्द बोलण्याकरिता काही क्षण असलेल्या एका माणसाची गोष्ट म्हणजे ‘काही क्षण प्रेमाचे’. ही गोष्ट आहे एका अशा सामान्य माणसाची जो आपल्या प्रेमळ, प्रामाणिक आणि कष्टाळू वृत्तीमुळे आजूबाजूच्या तसेच त्याच्या कंपनीतील लोकांचे मन जिंकतो. त्याच्या ह्याच वृत्तीमुळे त्याला त्याच्या क्षेत्रात यश मिळते. सर्व काही सुरळीत सुरु असताना त्याच्या आयुष्यात एक वादळ येते. त्या वादळातून तो आणि त्याचं कुटुंब कसं सावरते? कोणकोणत्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागते? कोणकोणत्या व्यक्तींसोबत तो काही क्षण प्रेमाचे घालवतो ह्या सर्व गोष्टींचा उलगडा ह्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहेत.

ह्या चित्रपटात सुबोध – भार्गवीसोबतच विजू खोटे, जयराम नायर, मनोज टाकणे, मैथली वारंग, डॉ. छाया माने, प्रशांत भेलांडे, जोती निसाळ, नरेश ठाकूर, नरेंद्र भोईर,कमलाकर पाटील , नामदेव पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ऋषी लोकरे, हंसिका माने, काव्या पाटील, शिवम यादव हे बालकलाकार म्हणून दिसणार आहेत. ह्या चित्रपटाचे संगीतकार अशोक पत्की असून सुरेश वाडकर, देवकी पंडित, श्रद्धा वानखेडे, शेफाली यांनी काही गाणी स्वरबद्ध केली आहेत. तर प्रवीण दवणे आणि राज माने हे गीतकार आहेत. ह्या चित्रपटातील गाणी नरेंद्र पंडित, राजेश पडवले यांनी कोरिओग्राफ केली आहेत. आशिष भास्कर केणी, कुमार हरिश हे कास्टिंग डिरेक्टर असून क्रेयॉन्स स्टुडियो हे चित्रपटाचे वितरक आहेत.

https://youtu.be/ZC6FUsFZb6Q

Author

Recommended

PeepingMoon Exclusive