By  
on  

ही मराठी अभिनेत्री विचारतेय “कुणी घरं देत का घर ?”

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउन आणि सध्याच्या परिस्थितीत अनेकांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. यातच मनोरंजन विश्वाचं ठप्प झालेलं काम काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलय. मात्र तरीही मनोरंजन क्षेत्रातील कलाकारा अनेक अडचणींना सामोरं जाव लागतय. यातली महत्त्वाची अडचण म्हणजे घराची. 
अभिनेत्री पूजा बिरारीला कोरोनाच्या भीतीमुळे घर मिळेनासं झालय. झी युवा वाहिनीवरील ‘साजणा’ या मालिकेत पूजा झळकली होती. आणि आता ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेतून तिला पुन्हा संधी मिळाली आहे. या मालिकेत काम करत असताना मुंबईत भाड्याने घर मिळणं दुर्लभ झाल्यानं तिला या अडचणीला सामोरं जावं लागतय. 

पूजा म्हणते की, “मी एक कलाकार आहे. तुम्ही मला झी युवा वाहिनीवर साजणा या मालिकेत पाहीलत आणि रमा या माझ्या व्यक्तिरेखेवर भरपूर प्रेम ही केलं. या लॉकडाऊनमध्ये देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळेच आपल्या सध्याच्या सरकारने सर्व गोष्टींची काळजी घेत न्यू-नॉर्मल लाईफचे आवाहन केले. आपली मनोरंजनसृष्टीसुद्धा हळूहळू का होईना सुरु झाली. पण काही प्रॉब्लेम्स हे मालिकांच्या बिहाइंड सीन सारखे आहेत आणि सध्या कलाकार म्हणून माझ्या बाबतीत ते घडत आहेत आणि म्हणूनच मला ते माझ्या लाडक्या प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत. सध्या कोरोनाच्या या संकटात कलाकार म्हणून तुम्हाला मुंबईमध्ये काम मिळेल मात्र राहायला भाड्याचे घर मिळणं दुर्लभ झालंय. झी युवा या वाहिनीने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत मला पुनः संधी दिली. या लॉकडाऊनमध्ये एक चांगले काम मिळणं हे प्रत्येक कलाकारासाठी खूप महत्वाचे आहे जे मला मिळालं मात्र ते जर तसच ठेवायच असेल तर मला मुंबईमध्ये राहयाला भाड्याने घर हवंय मात्र ते काही सध्या मिळताना दिसत नाही आहे आणि मला आता खरंच घर शोधण्याचा आणि सतत नकार मिळण्याचा  त्रास आणि कंटाळा आलाय. झी वाहिनी ने सेट वर जागा अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण ऑलरेडी अप्पा आणि काही इतर लोक शूटिंग सुरु झाल्यापासून राहत असल्यामुळे रूम्स नाही आहेत त्यामुळे ते शक्य झाले नाही . सध्या मी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण चे माझे सहकलाकार, सोहम निर्मिती संस्था आणि झी युवा वाहिनी सगळेच माझ्यासाठी घर शोधत आहेत. मात्र सध्या कोणत्याच सोसायटीमध्ये नविन व्यक्तीला प्रवेश नाही. मी आणि माझ्या सारखे अनेक कलाकार बाहेरच्या शहरातून मुंबईमध्ये कामा-निमित्त येतात. या लॉकडाऊनमध्ये न्यू-नॉर्मलचे पालन करत स्वतःची आणि इतरांची काळजी घेत आम्हाला काम करायचे आहे. पण काही निवडक सोसायटी सेक्रेटरी आम्हाला लॉकडाऊनच्या नावावर जागा द्यायला नकार देत आहेत. सध्या सगळं हळूहळू सुरु झालंय पण अजूनही न्यू नॉर्मलचे रूल्स मानले जात नाही आहेत. स्वतःची काळजी घेऊन जर काम नाहीं सुरु करू शकलो तर कसं होणार? मला अजूनही घर मिळत नाही आहे . कलाकरांना होणाऱ्या या त्रासाबद्दल कोणी काही मार्गदर्शन करू  शकेल का?”
तेव्हा कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या हळूहळू सगळं सुरळीत होत असलं तर अद्याप बऱ्याच गोष्टी अजूनही सुरळीत झाल्या नसल्याचं चित्र पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive