अभिनेता अक्षय वाघमारे आणि गुन्हेगारी गँगस्टर विश्वातलं प्रसिद्ध नाव अरुण गवळींची कन्या योगिता यांनी याच वर्षी लग्न केलं. लॉकडाउनच्या काळात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांचं लग्न चांगलच चर्चेत राहिलं.
नुकताच योगिताचा वाढदिवसही पार पडला. यावेळी योगिताने संपूर्ण परिवार आणि अक्षयसोबत हा खास दिवस साजरा केला. यावेळी अरुण गवळीसह गवळी परिवारही सोबत होता. अक्षयने नुकतच या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. शिवाय योगितासोबतचा खास फोटो शेयर करत तिल्या शुभेच्छाही दिल्या होत्या.
अक्षयने अरुण गवळींची कन्या योगिताशी लग्न केल्यानं हे लग्न चर्चेत राहिलं. दगडीचाळीतच दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. दोघांच्या मेहंदीच्या कार्यक्रमापासून विवाहसोहळ्यापर्यंतचे कार्यक्रम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. सोशल मिडीयावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ हे चर्चेत असतात.