पाहा Photos : जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने स्वप्निल जोशीने शेयर केली या फोटोंची आठवण

By  
on  

 आज जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर सुंदर छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील फोटोग्राफीची आवड असणाऱ्या कलाकारांनीही विविध पोस्ट केल्या आहेत. तर दुसरीकडे काही कलाकारांनी प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले त्यांचे उत्तम फोटोही पोस्ट केले आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीने या निमित्ताने काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्वप्निलने त्याचे काही जुने फोटो पोस्ट करून जगातिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

इन्स्टाग्रावर केलेल्या या पोस्टमध्ये स्वप्निल म्हणतो की, "हौशी हे नेहमीच मजेदार असतं! हे माझी खूप जुन मजेशीर फोटोशुट. बघा मी कशा पोझ देतोय. खूप प्रयत्न करतोय. मजेशीर वेळ."

 

स्वप्निलच्या चाहत्यांनाही त्याचे हे जुने फोटो प्रचंड आवडले असून त्यांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Recommended

Loading...
Share