By  
on  

पाहा Video : या कारणासाठी 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्री रुपाली भोसलेने मानले चाहत्यांचे आभार

'आई कुठे काय करते' हे मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेचा विषय, कहाणी आणि पात्र सगळच प्रेक्षकांना आवडल्याचं पाहायला मिळतय. यातच मालिकेत एक पात्र रिप्लेस करण्यात आलं. मालिकेतील संजनाचं कॅरेक्टर आता रिप्लेस करून ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले करत आहे.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात रुपाली भोसले स्पर्धक म्हणून दिसली होती. रुपाली भोसलेचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. आणि हाच चाहता परिवार आता 2 लाखांपर्यंत पोहोचला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवर रुपालीला 2 लाख चाहते फॉलो करत आहेत. याच निमित्ताने या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी रुपालीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

याशिवाय रुपाली 'बडी दुर से आए है' या हिंदी मालिकेतीह झळकली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive