By  
on  

सायली संजीव विचारते, हा क्षण आपण pause करु शकतो का?

'काहे दिया परदेस', म्हणत छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहचलेली आणि आता मराठी सिनेसृष्टीत आपले पाय घट्ट रोवणारी अभिनेत्री आहे, सायली संजीव. तिच्या विविध आगामी सिनेमांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागून राहिलेली असते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सायलीच्या पोस्टची नेहमीच चाहते वाट पाहतात. 

सायलीने नुकताच तिचा एक सुंदर हिरवा ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. ती कॅप्शनमध्ये विचारते, हा क्षण आपण pause करु शकतो का?...तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा जणू वर्षावच सुरु केला आहे. 

 

लॉकडाऊनपूर्वीच सायलीच्या अनेक सिनेमांची घोषणा सोशल मिडीयावर पाहायला मिळाली होती. त्यापैकी एबी आणि सीडी हा सिनेमा प्रदर्शितही झाला होता. पण नंतर लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमागृह बंद करण्यात आली. 'मनफकीरा'नंतर 'बस्ता', 'पैठणीची गोष्ट' हे सायलीचे सिनेमे आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive