गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलाय आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी आता जोरदार सुरु आहे. यातच काहींनी घरातच मातीपासून बाप्पा साकारले आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांकडे बाप्पाचं आगमन होतं. काही कलाकार घरातच गणपतीची मुर्ती तयार करतात.
कवी संदीप खरे यांनी यावर्षी घरातच बाप्पाची मुर्ती साकारली आहे. संदीप यांनी घरातच मातीचे बाप्पा तयार केले आहे. यानिमित्ताने संदीप यांनी पहिल्यांदाच मातीकाम केलं असल्याचं ते त्यांच्या सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये सांगतात. संदीप यांनी मातीपासून अतिशय सुंदर मूर्ती साकारली आहे. आणि या मूर्तीचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
संदीप खरे या पोस्टमध्ये लिहीतात की, "माती भिजते मायेसारखी, हात 'आई' होत जातो ....घडवणाऱ्याची मजा बघत, घडविता' घडत जातो ...!! माझं आयुष्यातलं पहिलं मातीकाम, बाप्पा मोरया"
आता बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु असल्याने सोशल मिडीयावरही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.