By  
on  

प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा 'फायरब्रॅण्ड' लवकरच नेटफ्लिक्सवर

बॉलिवूडकरांना नेहमीच मराठी आणि मराठी सिनेमांचं अप्रूप वाटत आलं आहे. आजवर अनेक बॉलिवूडकरांनी मराठी सिनेनिर्मितीत पाऊल ठेवलं आहे. मग देसी गर्ल यात मागे कशी राहील. प्रियांका नेहमीच मराठीच्या प्रेमात आहे, हे कधीच लपून राहिलेलंं नाही. ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर तिचा दुसरा मराठी सिनेमा 'फायरब्रॅण्ड' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे प्रियांकाचे होम प्रोडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सची निर्मिती असलेला 'फायरब्रॅण्ड' हा मराठी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 22 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची धुरा पुरस्कार विजेत्या लेखिका-दिग्दर्शिका अरुणा राजे सांभाळत आहेत. आजच्या आधुनिक युगातील नातेसंबंधावर हा सिनेमा भाष्य करतो.

'फायरब्रॅण्ड' सिनेमात अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री राजेश्वरी सचदेव पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. तर अभिनेत्री उषा जाधव हिला वकिलाच्या भूमिकेत असून अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळेल.

 

https://twitter.com/priyankachopra/status/1093005271637454848

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive