By  
on  

'जय देवा श्री गणेशा'मध्ये शंकरदेवांचा रूद्र अवतार

गणपती बाप्पाच्या आगमनासह गणरायाची कथा टेलिव्हिजनवर पाहायला मिळतेय. 'जय देवा श्री गणेशा' या नव्या मालिकेतून गणपती देवाच्या जन्मापासूनची कथा पाहायला मिळत आहे. अभिनेता पंकज विष्णू या मालिकेत देवा शंकराच्या भूमिकेत आहे. नुकतीच ही मालिका प्रसारित झाली आहे. नुकत्याच झालेल्या भागात शंकर देवाचा रूद्र अवतार पाहायला मिळाला आहे. हा अवतार कशामुळे आणि कुणामुळे हे मालिकेत दाखवलं आहे. 

नुकतच शंकराची भूमिका साकारणाऱ्या पंकज विष्णूने त्याचा रूद्र अवतारातील फोटो पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहीलय की, "रूद्र  ... !!! कालचा अवतार पाहिलात का...??!!  पहायला विसरु नका ....गणपतीची 11 विशेष भागांची नवी मालिका 'जय देवा श्री गणेशा', पहा बाप्पाच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतच्या कथा, बोला, गणपती बाप्पा मोरया.."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रूद्र ... !!! कालचा अवतार पाहिलात का...??!! #namesofshiva #shiva #neelkanth पहायला विसरु नका .... गणपतीची 11 विशेष भागांची नवी मालिका * जय देवा श्री गणेशा* पहा बाप्पाच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतच्या कथा रोज रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्रवाह वर बोला, गणपती बाप्पा मोरया... @star_pravah @realswastik #instabappa #shiva #JaiDevaShreeGanesha

A post shared by Pankaj Vishnu (@pankajvishnu) on

 

तेव्हा या अकरा भागांच्या या मालिकेत देवा श्री गणेशाच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतची कथा पाहायला मिळतेय. गणेशोत्सवाच्या काळात ही मालिका पाहणं गणेश भक्तांसाठी पर्वणी ठरतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive