By  
on  

मस्तीच्या धुंदीत असलेल्या 'आम्ही बेफिकर'चं हे पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

तरुणाई म्हटलं की त्यांच्यात एक वेगळीच धुंदी असते. हीच तरुणाईची झिंग चढलेल्या चार तरुणांची गोष्ट आगामी 'आम्ही बेफिकर' सिनेमात अनुभवता येणार आहे. या सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. पोस्टरवरून हा सिनेमा युथफुल आणि धमाल असल्याची समजतंय. अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सुयोग गो-हे ही जोडी प्रमुख भूमिकेत झळकते आहे.त्यांच्यासह राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा हा सिनेमा आहे, असं म्हणण्यास हरकत नाही.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं असून सिनेमाचे संगीत प्रणय अढांगळे यांचे आहे.

https://www.instagram.com/p/BtdQlbggN8t/?utm_source=ig_embed

 

आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा 'आम्ही बेफिकर' सिनेमा येत्या 8 मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive