By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फेस्टिव्ह सिझन लुक

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर या उत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय. कुणी पारंपारिक वेशभुषेतील तर कुणी फेस्टिव्ह लुक पोस्ट करताना दिसत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात त्यांचे फेस्टिव्ह लुक पोस्ट करताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही तिचे काही फोटो सोशल मिडीयावर नुकतेच पोस्ट केले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात प्राजक्ता ही सुत्रसंचालकाची धुरा सांभाळतेय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राजक्ताचे विविध लुक या कार्यक्रमात पाहायला मिळतात. अगदी वेस्टर्न पासून ते पारंपारिक वेशभुषेपर्यंत विविध लुकमध्ये प्राजक्ता या कार्यक्रमात दिसते.

सध्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेही प्राजक्ताने खास लुक केला होता. याच लुकचे काही फोटो प्राजक्ताने पोस्ट केले आहेत. 

या फोटोंमध्ये प्राजक्ताने पिवळा-पांढरा असं कॉम्बिनेशन असलेला लेहंगा परिधान केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive