By  
on  

टेलिव्हिजनवर रमाबाई साकारणारी अभिनेत्री रेवती खऱ्या आयुष्यात आहे या अभिनेत्याच्या प्रेमात

टेलिव्हिजनवरील 'स्वामिनी' मालिका ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. छोट्या रमाबाई आता मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडत जातं हे या मालिकेत पाहायला मिळतय.

अभिनेत्री रेवती लेले मोठ्या रमाबाईंची भूमिका साकारतेय. तिला या भूमिकेत प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतय. 

मात्र टेलिव्हिजनवर रमाबाई साकारणाऱ्या रेवतीच्या खऱ्या आयुष्यात एका अभिनेत्यालाच डेट करतेय. सोशल मिडीयावर या दोघांचे फोटो प्रचंड चर्चेत असतात. अभिनेता आदिश वैद्य आणि रेवती काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सोशल मिडीयावरील त्यांचे फोटो तर कपल गोल्स देणारे आहेत. आदिशही विविध हिंदी आणि मराठी मालिका तसेच जाहिरातींमध्ये झळकतो. 

त्यांचे रोमँटिक फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच लोकप्रिय आहेत. नुकताच आदिशने रेवतीसोबतचा ट्रेडिशनल पेहरावातील फोटो पोस्ट केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No matter what, I got your back.

A post shared by Adish Vaidya (@adishvaidya_92) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive