By  
on  

कलाकारांसोबत ‘भाई’ सिनेमाचा उत्तरार्ध पाहायचाय? मग हे करा

ज्या व्यक्तीच्या साहित्यामध्ये अवघ्या महाराष्ट्राचं चैतन्य सामावलेलं असतं ती व्यक्ती म्हणजे पु.ल. याच पुलंच्या ‘भाई : व्यक्ती की वल्ली या बायोपिकच्या पूर्वार्धाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा उत्तरार्ध रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे काही भाग्यवान विजेत्यांना हा सिनेमा कलाकारांसोबत पाहण्याची संधीही मिळणार आहे.
यासाठी तुमच्याकडे असलेल्या पुलंच्या पुस्तकांसोबतचा फोटो पाठवून सोशल मीडियावर #पुस्तकआणिपुलं या हॅशटॅगसह पाठवावा. यातील ३ भाग्यवान स्पर्धकांना ‘भाई : व्यक्ती की वल्लीच्या’ कलाकारांसोबत प्रिमियरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडियावर पोस्ट टाकताना पुलंचं हे पुस्तक तुम्हाला का आवडतं हे लिहून @Viacom18marathi ला टॅग करा.

https://twitter.com/Viacom18Marathi/status/1090894051744890880

‘भाई ; व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धात पु.लंच्या व्यक्तीपासून ते व्यक्तीमत्त्वापर्यंतचा प्रवास पहायला मिळेल. पु.ल.च्या बालपणीचा रोल सक्षम कुलकर्णी साकारत आहे. तर वार्धक्यातील पु.ल. या टीझरमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळी दिसत आहेत. त्यामध्ये आचार्य अत्रे, भक्ती बर्वे, पंडित जवाहरलाल नेहरु, विजया मेहता, बाबा आमटे, बाळासाहेब ठाकरे अशी मंडळी भाईच्या उत्तरार्धात दिसून येतील. त्यामुळे पुर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अधिक रंगत वाढेल यात शंका नाही. हा सिनेमा ८ फेब्रुवारी २०१९मध्ये रसिकांच्या भेटीला येतोय. त्यापूर्वी पटकन पु.ल.च्या पुस्तकासोबतचा सेल्फी पाठवायला विसरू नका.

https://twitter.com/Viacom18Marathi/status/1092783210805772289

Recommended

PeepingMoon Exclusive