सोशल मिडीया हे माध्यम मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी महत्त्वाचं माध्यम बनलय. या माध्यमातून सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधतात किंवा त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती पोस्टच्या माध्यमातून समोर आणत असतात. कलाकार त्यांची विविध मते सोशल मिडीयातून व्यक्त करत असतात.
अभिनेता स्वप्निल जोशीदेखील विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तर स्वप्निलचा मोठा चाहतावर्ग आहे. स्वप्निल त्याच्या विविध गोष्टी इन्स्टाग्रावर पोस्ट करत असतो. आणि आता या चाहत्यांचा आकडा चक्क 1 मिलीयनवर येऊन पोहोचलाय. म्हणजेच इन्स्टाग्रामवर स्वप्निलला आता चक्क 10 लाख चाहते इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
हाच आनंद स्वप्निलने एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. स्वप्निलने एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'समांतर' या स्वप्निल जोशीच्या डेब्यू वेब सिरीजने प्रेक्षकांची मनं जिंकली आता चाहते समांतरच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.