By  
on  

प्रिया आणि उमेश हे रिअल लाईफ कपल एकत्र झळकणार, चाहत्यांना उत्सुकता

मराठी सिनेसृष्टीतील क्युट जोडपं प्रिया आणि उमेश कामत यांनी चाहत्यांसोबत एक गोष्ट शेअर केली आहे. प्रिया आणि उमेश आता एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या दोघांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बाब शेअर केली आहे. या सिनेमाचं नाव अजून जाहीर झालेलं नाही. या सिनेमाची कथा किंवा प्रिया आणि उमेश यांच्या भूमिकेबद्द्ल अजूनपर्यंत कोणतीच बाब समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/BtiH9GAhHeT/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोमुळे हे दोघं वरुण नार्वेकरच्या सिनेमात काम करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उमेश आणि प्रिया जवळपास सहा वर्षांनी एकाच सिनेमात झळकणार आहेत. त्यांनी २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘टाईमप्लीज’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची चाहते आतुरतेने वाट पहात होते. प्रिया आणि उमेशने त्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे.

https://www.instagram.com/p/Br_6b8WBb9U/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive