By  
on  

पाहा Video : गौराईच्या आगमनासाठी असे नटले 'रंग माझा वेगळा' मधील कलाकार

गणेशोत्सवात गौरी पूजनानिमित्त अनेक ठिकाणी गौराईचं आगमन झालं आहे. याशिवाय मालिकांच्या सेटवरही ही सण उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात. मालिकेच्या त्या उत्सवाच्या सीनच्या निमित्ताने कलाकार त्यांच्या सणाची हौस सेटवर भागवून घेताना दिसतात.

'रंग माझा वेगळा' मालिकेतही असाच स्पेशल भाग चित्रीत करण्यात आला होता. या निमित्ताने दीप म्हणजेच अभिनत्री रेश्मा शिंदे चांगलीच नटलेली दिसली. रेश्माने नुकताच या सीन दरम्यानचा ऑफस्क्रिन व्हिडीओ शेयर केला आहे.

 

या व्हिडीओत दीपाची दुसरी आई आणि मानलेली बहीण पाहायला मिळतेय. अर्थात मालिकेत यादोघी जरी दीपाच्या विरोधात आणि खलनायकी भूमिकेत असल्या तरी या व्हिडीओत या तिघींचीही ऑफस्क्रिन चांगली बाँडिंग पाहायला मिळतेय. यावेळी हे कलाकार पारंपारिक वेशभुषेत पाहायला मिळत आहेत.

या पोस्टमध्ये रेश्मा शिंदे लिहीते की, "कशी सुरू आहे गौरी ची तयारी, आमची झालीय तुमची झाली का?

Author

Recommended

PeepingMoon Exclusive