By  
on  

आशुतोष पत्कीला वडिलांकडून मिळते प्रेरणा, वडिलांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावरही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पोस्ट केल्या जात आहेत. अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की हा अभिनेता आहे. सोशल मिडीयावर आशुतोष देखील सक्रिय असतो. 

आशुतोषने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट करून वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. आशुतोषने वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करून छोटासा मेसेज देखील त्यात कॅप्शनमध्ये लिहीला आहे.

आशुतोष या पोस्टमध्ये  लिहीतो की, "तुम्ही उत्तम वडिलापेक्षाही अधिक आहात, तुम्ही माझी प्रेरणा आहात, शिक्षक आणि मित्रही, वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड".

अशोक पत्की यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी प्रेक्षकांना दिली आहेत. ते भारतातील सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक आहेत. तर मुलगा आशुतोष अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आशुतोष हा सोहम ही महत्त्वाची भूमिका साकारतोय. या मालिकेतील त्याचं बबड्या हे पेटनाव चांगलचं गाजलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive