गणपती बाप्पानंतर आज गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे. गणपती बाप्पाची आई आणि शक्तिचं प्रतिक असलेल्या गौरीच्या पूजा-अर्चेला धार्मिक परंपरेत खुप महत्त्व आहे. गौरी पूजनाचा एकूण उत्सव तीन दिवसांचा असतो. आगमन ,नंतर प्रथेप्रमाणे पूजन आणि तिस-या दिवशी विसर्जन. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात.
यंदा गणेशोत्सवात मराठी मालिका आणि वेबविश्वातली प्रसिध्द अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेला महालक्ष्मी पूजनाची प्रचंड आठवण येतेय,यावर्षी कामानिमित्त घरापासून दूर मुंबईत असलेली भाग्यश्रीने घरच्या महालक्ष्मी पूजनाचा सुरेख व्हिडीओ शेअर करत मनोभावे प्रार्थना केली आहे.
या उत्सवात घराची प्रचंड आठवण येत असल्याने भाग्यश्री प्रार्थना करते, "आल्या का महालक्ष्मी कशाच्या पाई...तुमच्या सगळ्यांनच्या सुखा समृद्धिच्या पाई. जय देवी महालक्ष्मी."